¡Sorpréndeme!

Harshwardhan Sapkal | भाजप 2034 मध्ये देशात नवं संविधान आणणार, काँग्रेसचा खळबळजनक दावा

2025-04-15 0 Dailymotion

Harshwardhan Sapkal | भाजप 2034 मध्ये देशात नवं संविधान आणणार, काँग्रेसचा खळबळजनक दावा
गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान राहूनही मोदींनी काहीच केलं नाही सांगण्यासारखं काही नसल्याने काल त्यांनी आंबेडकरांचा मुद्दा उपस्थित केला. भ्रम पसरवणे , काँग्रेसला बदनाम करणे एवढेच मोदींनी सुरू केल आहे. पंतप्रधानांचा असं वर्तन हे अशोभनीय आहे.  # पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांना थेट सन्मानाच कायदामंत्री पद दील होतं हे मोदींनी विसरू नये.   नाशिकच्या काळाराम मंदिरात डॉ. बाबासाहेबांना दर्शन घेऊ दिल नाही हे दुर्दैव आहे  # दलित ओबीसी आणि काँग्रेसमध्ये मोदी निर्माण करू बघत आहे. समाजातील वेगवेगळ्या घटकांना मोदी फॅसिस्ट करत आहेत.   आरएसएस जनसंघ व आजच्या भाजपच्या लोकांनी बाबासाहेबांना नेहमीच असन्मानित केलं आहे.  मनुस्मृतिद्वारे संविधान लिहिलं जावं व मनुस्मृतिद्वारे संविधान चालावं असं गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं "बंच ऑफ थॉट" हे भाजपच " बायबल " आहे.   भाजपला संघाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान आहे हे मान्यच नाही.  भाजपाला जर इतकं वाटत असेल तर त्यांनी गोळवलकर गुरुजींनी लिहिलेलं बंच ऑफ थॉटची होळी करावी.  # डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः कधीही काँग्रेस मुळे माझा पराभव झाला असं म्हटलं नाही उलट त्यांनी त्यांच्या पराभवाच्या कारण... डांगे व विनायक दामोदर सावरकर यांच्यावर फोडलं.  मोदींना व्यक्तिशः, पक्ष संदर्भात आणि विचारधाराशी संबंधी भारताच संविधान मान्य नाही.  # संविधान लिहिताना ते मनुस्मृती संबंधित लिहिल्या गेलं पाहिजे असं संघाने आणि जन संघाने सांगितलं होतं याचे पुरावे उपलब्ध आहेत. ते समतेच्या विरोधात होते.  सध्या देशात नवीन संविधान निर्मितीची प्रक्रिया संघ आणि भाजपच्या बगलबच्चांनी सुरू केली आहे. २०३४ साली आम्ही नवीन संविधान लागू करू यासाठी त्यांच्या बैठकाही सुरू आहेत.